अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील आज रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. त्या सभेला गावातील शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या उपस्थित होती. त्यामध्ये ग्रामसभेत आवासलस योजनेमधील विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी.) लाभार्थी यादी मधून मोदी आवास योजनेसाठी पात्र कुटुंबाची प्राधान्यक्रम यादी करणे, ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रिजेक्ट झालेली दोन्ही यादीतील समाविष्ट नसलेले परंतु पात्र असलेले ग्रामसभेने सुचवलेले इतर मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.) लाभार्थी यांची यादी तयार करणे तसेच गावातील तंटामुक्त अध्यक्ष यांची निवड करणे, मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांना गावबंदी करणे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये दोन अर्ज आले होते. यात अनंता बोंद्रे व प्रवीण इंगळे असे उमेदवाराचे नाव होते. त्यामध्ये गावातील अनंता बोंद्रे यांनी बहुमताने आपल्या पदाची बाजी मारून प्रवीण इंगळे यांची हार केली आणि गावातील तंटे सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही लोकांना दिली. यामध्ये आजच्या ग्रामसभेत गावातील ग्रामसेवक, गावातील सरपंच प्रदीप शिरडकर, ग्रामपंचायत सदस्य भगवान बोरकर, अविनाश वटाणे, अंकुश मिराशे, सुभाष बोरकर, राजू भोसले, बलराम वानखेडे, अंकुश मिराशे, अंकुश अडाणे, गजानन हरण, चेतन बाभुळकर, विजय वटाणे, शंकर हरण, पिराजी बोरकर, गणपत ठोके, दिनेश मिराशे, धोंडीराम शेळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.