प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२८ नोव्हेंबर पासून जालना येथे दीपक रणवरे हे ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर पासून जालना येथे अमोल उपोषणास बसणार आहेत. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने जमेल तसे काम केले पाहिजे आज आपल्याला माहित आहे की समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक ,परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक मुलं हुशार आहेत परंतु त्यांना शिक्षणासाठी पैसा नसल्यामुळे योग्य कॉलेज मिळत नाही यासाठी आपण गेल्या पंधरा वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने मोर्चे काढले परंतु शासनाने याकडे लक्ष दिले नाही. सरकारचे ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे लक्षवेधी यासाठी दीपक रणवरे हे २८ नोव्हेंबर पासून उपोषणास बसणार आहेत. समाजासाठी प्रत्येकाने जमेल त्या परीने थोडा बहु त्याग व सहकार्य करावे असे दीपक रणवरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ज्या कुण्या समाज बांधवांना समाज हितासाठी उपोषणास बसण्याची इच्छा असेल त्यांनी सोबत यावे असे आव्हानत्यांनी समाज बांधवांना केले आहे. तसेच समाज बांधवांनी व सर्व ब्राह्मण समाजाने या उपोषणास जमेल त्या परीने सहकार्य करावे सर्व समाजाची साथ हवी आहेअसे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले . सदरील उपोषणाची तयारी व समाज बांधवांच्या गाठीभेटी व सर्वांना सुचित करण्यासाठी विजयादशमी (दसऱ्याच्या दिवसापासून) प्रारंभ केला आहे तालुके, गाव, जिल्हा, या ठिकाणी भेटी देऊन समाज बांधवांना सुचित करत आहेत. पाथरी येथे समाज बांधवांशी चर्चा करून सदरील उपोषणाची माहिती त्यांच्या उपोषणाला पाथरी शहरातून पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय समज बांधवांनी घेतला आहे. दीपक रणवरे यांनी समाज बांधवाला या लढ्यात सामील होण्याच्या आव्हान केले आहे. हा लढा यशस्वी होण्यासाठी विजया कुलकर्णी, श्रीकांत जोशी, संजय देशपांडे, महेश अकोलकर, श्याम कुलकर्णी, योगेश जाणतीकर, श्रीराम शेटे, श्रीनिवास केजकर, श्रीधर खोत, डॉ. राजेंद्र चौधरी, अजिंक्य पांडव, मंदार कुलकर्णी, अनिल डोईफोडे, आलोक चौधरी, दत्ता महाजन ,गणेश लंके, प्रसन्ना कुलकर्णी ,विनायक अहंकारी ,प्रमोद कुलकर्णी ,इंद्रजीत इनामदार ,विनायक कुलकर्णी ,मधुसूदन दंडारे,वैभव मुळे, नितीन पाटील ,हे परिश्रम घेत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)