अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
आंबेघर :- आंबेघर गावात दरवर्षी प्रमाणे दुर्गा उत्सव साजरा केला जातो .महिलांनी एकत्र यावे या उद्धेशाने महिलांनी हळदी- कुंकू कार्यक्रम पार पडला.गावातील मुलांना प्रोत्साहन मिळावे आणि आपल्या गावाचे नाव मोठे करावे या उद्धेशाने शारदा मित्र मंडळ विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहेत.या वर्षी मुलांमध्ये उत्साह वाढवा प्रत्येक मुलाला संधी मिळावी म्हणून धावणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मटका फोडी, संगीत खुर्ची तसेच वाढत्या महागाई मुळे निसर्गातील वस्तू जसे की पाने, फुले, काड्या पासून रांगोळी बनवणे यासारखे विविध खेळ घेण्यात आले यामध्ये मुलांनी सहभाग दर्शवला होता आणि यामध्ये मुलांचे नंबर काढून त्यांना मंडळा मार्फत बक्षीस देण्यात आले. सोबत गावामध्ये कार्यरत असलेल्या माऊली स्पोर्ट मधील काही मुलांचे धावण्यामध्ये राज्य स्तरीय निवड झाली आहे अश्या मुलांना मंडळाचे अध्यक्ष निलेश कोदे यांच्या कडून प्रोत्सान म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले व मंडळाकडून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस कार्यक्रमास गावकरी ,माऊली स्पोर्ट चे सुरज हाडळ ,प्रथम प्रतिनिधी ,मंडळाचे निलेश कोदे, अरविंद तांडेल,गोपीनाथ कोदे,जयेश सुतार,प्रदिप तांडेल,संगम तांडेल,महेश तांडेल, पुंडलिक सुतार, किसन तांडेल,रुपेश तांडेल,मंदा तांडेल,तुळशी सुतार, रोहिणी कोदे उपस्थित होते.