राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी अमरापुर
अमरापूर :दीपावली मध्ये आपल्या घरावर आकाश कंदील स्वतः बनवून लावला तर चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणीत होईल. म्हणून शुक्रवार दि. २७ रोजी विद्यार्थ्यांना शाळेतच पर्यावरणपूरक कमी खर्चात विविध आकारात रंगबेरंगी आकाशकंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक अमरापूर माध्य. व उच्च माध्य.विद्यालय अमरापूर येथे देण्यात आले . विद्यालयाचे कलाशिक्षक अशोक तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या 150 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी रंगबेरंगी कागद वापरून स्वतः नवनिर्मितीचा आनंद घेत आकाशकंदील बनवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अल्पदरात पर्यावरण पूरक आकाशकंदील आपल्या घरावर लावून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान केले.या वेळी शशिकांत काकडे,अशोक जाधव, श्रीम्.उज्वला नांगरे , श्रीम. गीता करपे, श्रीम.कल्याणी काकडे , सुधाकर वावरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.