अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार रविवार 29 ऑक्टोंबर रोजी मराठवाडा महसूल प्रबोधिनी संभाजीनगर येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील चाणक्य कोचिंग क्लासेस संचालक प्रा. विशाल घुगे यांना चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्र राज्य संचालक प्रा.गोपीचंद चाटे सर यांच्या हस्ते कोचिंग क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कामगिरीबद्दल व मिळालेल्या सन्मानचिन्ह बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कोचिंग क्लासेस चालवणारा वर्ग सर्वात जास्त सुशिक्षित मी स्वतःच्या बळावर स्वतःचे साम्राज्य उभा करणारा वर्ग आहे. कित्येक वर्ष झाले कोचिंग क्लासेसचे संचालक व शिक्षक स्वतःसाठी व इतरांसाठी स्वबळावर स्वयंम रोजगार निर्माण करून समाजाला जीव ओतून सुशिक्षित करण्याचे काम करत आहे. सरकारची नेहमीच या समूहाकडे दुर्लक्ष राहिले आहे. पूर्ण काळात आलेल्या अनेक अडचणी सरकारकडून वारंवार कोचिंग क्लासेस बंदचे आदेश आदेश याला कंटाळून कोचिंग क्लासेस संचालकांनी एकत्र येऊन सर्व अन्यायपूर्ण परिस्थिती लढा देण्याचे ठरवले. महाराष्ट्रात जवळपास एक लाख संचालकाचे असोसिएशन तयार झाले. कोचिंग क्लासेस वर येणाऱ्या कुठल्याही अन्यायाला लढा देण्यासाठी हे असोशियन भक्कमपणे एकमेकांसोबत उभे राहून कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षक यांना सन्मान व न्याय मिळवून देण्यात मदत करणार आहे. ही कोचिंग क्लासेस बळकट करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस संचालक किंवा शिक्षकांचा फार मोलाचा वाटा आहे. यात वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चाणक्य कोचिंग क्लासेसचे संचालक विशाल घुगे सरांना कोचिंग क्लासेस क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनाथ मुलांना व सैन्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना ते मोफत पणे शिक्षण देत आहेत . कोरोना काळात बऱ्याच साऱ्या रक्तदान शिबिराचे त्यांनी आयोजन केले होते या सर्व कामगिरीची राज्याच्या कार्यकारणी दखल घेतली.
सदर कार्यक्रमासाठी वाशिम येथील प्रा. पंकज कुमार बांडे, राज्यउपाध्यक्ष महाराष्ट्र , प्रा.गोपाल वांडे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष , जिल्हा अध्यक्ष प्रा.अतुल वाळले प्रा.कल्पेश राऊत ,वाशिम जिल्हा सचिव , प्रा.प्रवीण गोटे ,वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.स्वप्निल बकाल ,कारंजा तालुका अध्यक्ष ,अशी वाशिम कोचिंग ची मंडळी या वेळी उपस्थित होती.