अनंत कराड
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
शिरसाटवाडी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी शेवगाव पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते कै. लोकनेते बबनराव ढाकणे यांच्या दुःखद निधनामुळे भैरवनाथ मंदिर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन शिरसाटवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी अनंत कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ढाकणे साहेब म्हणजे सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यासाठी लाईट पाणी सरकारी दवाखाने रस्ते व पाझर तलाव हे सर्व कामे ढाकणे साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. ढाकणे साहेबांच्या जाण्यामुळे पाथर्डी तालुक्यात शोक काळा पसरले असून त्यांच्यासारखे परत दिन दलित वंचितांची सेवा करणारे दैवत निघून गेल्यामुळे आज पाथर्डी तालुका फार मोठ्या लोकनेत्याला त्यांचे विचार आचार कधी विसरणार नाही असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जनार्दन शिरसाट संचालक पप्पू शिरसाट सर संभाजी शिरसाठ मेजर नामदेव खाडे महादेव कराड रेवन शिरसाट गणेश शेकडे रामा खाडे व अनेक मान्यवर मंडळी व महिला मंडळी या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.