सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मराठा समाजाचे नागरिकांनी तहसिलदार कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि आमरण उपोषणाला बसलेले दिसत आहेत. जिल्ह्यातील परळी वैजनाथ, अंबाजोगाई याठिकाणी संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात शत्रगुण काशिद यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली ही घटना काल रात्री १०: ३० वाजता घडली असून अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी राजे चौक या ठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस ठाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी राजे चौक याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या शत्रगुण काशिद यांचे पार्थिव आम्ही उचलणार नाही असा पवित्रा घेत शत्रगुण काशिद यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही असे सांगितले .