गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी किनवट
तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या पांगरपहाड तांडा येथे पगडी कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी पार पडला असून या पगडी कार्यक्रमात गावच्या नायकपदी जयदेव जाधव याची गावकऱ्यातून निवड करण्यात आली आहे.
प्रथमता बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज, परमतपस्वी महान संत स्व. रामरावजी बापू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित परिसरातील गावच्या तांड्याच्या नायकांच्या हस्ते पांगरपहाड येथील गावकऱ्यांनी निवडलेले नूतन नायक म्हणून जयदेव जाधव यांची निवड गावकऱ्यांनी केल्याने त्यांना पगडी बांधून त्याचा यशोचीत सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमास बापूराव नायक, रामराव रेवा नायक, अर्जुन मोहन नायक ,शामराव गेमसिंग नायक, माजी सरपंच रुपसिंग राठोड, पत्रकार ईश्वर जाधव, प्रसराम देवी पुजारी ,जयसिंग हुनाजी कारभारी ,शेषराव मोहन डाव, रामराव बाळाराम, अर्जुन जाधव गोकुळ जाधव, साईनाथ जाधव, राहुल उत्तम, रवींद्र पोमा, मांगीलाल जाधव. यांच्यासह अन्य गावकरी व परिसरातील ताड्यातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.