संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
कला ही मानवी जीवनाचा उत्कर्ष करत असते कलेतूनच माणूस आनंद लुटत असतो . कलावंत या सृष्टीचा नेहमी स्वर्ग बनवित असतात . निरुपयोगी वस्तूतून टिकाऊ आणि सुबक वस्तू निष्णांत कलावंतच निर्माण करू शकतात. विद्यामंदिर माध्य. प्रशालेत श्री प्रसाद राणे सर हे स्वतः कलेचे जाणकार आहेत कलेत पारंगत आहेत . आपल्यातील कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यामंदिर प्रशालेत सर अफाट कष्ट घेत असतात . मातीच्या मूर्ती घडविण्यापासून ते कोलाज कले पर्यंतचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात . भारतीय चित्रकला ते पाश्चात चित्रकला विद्यार्थ्यांना आली पाहिजे यासाठी राणे सर सतत विविध प्रयोग राबवत असतात चित्रकलेतून पर्यावरण जनजागृती उत्तम रितीने करतायेत हे राणे सरांनी जाणले आणि पर्यावरण सेवा योजनेचा विभाग सुद्धा शाळेत समृद्ध करून सोडला . विद्यार्थी . पालक शिक्षक सहकारी शिक्षक यांनाही कलेची अभिरुची वाढविण्याचा प्रयत्न राणेसरांकडून प्रशालेत होत असते . कोणतीही शाळा ही विविध जीवनोपयोगी कलेतेतून शोभून दिसत असते . आणि जीवन जगण्याची शक्ती प्राप्त करते . याच सेवेतून आकाश कंदील ही संकल्पना सूचली आणि विद्यामंदिर प्रशाला झपाटून कलेच्या प्रांतात तरंगत गेली सुयोग्य नियोजन नेटकी मांडणी विविध रंगांचे देखणे सुशोभिकरण वेगवेगळे आकार सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू कमी खर्चात निर्माण करता येतात याच उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांना राणेसरांनी दाखवून दिले . महाराष्ट्रीय सण आणि चित्रकला यांचा समन्वय विद्यामंदिर प्रशालेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जगण्याची कला राणे सरांनी आपल्या विषयातून दाखवून दिली . गणेश चतुर्थीचा सणाला मूर्ती कशी रंगवावी याचे प्रात्यक्षिक शाळेत घडवून आणले रक्षाबंधन सणाला सुंदर सुंदर राख्या तयार करण्याचे शिक्षण दिले त्यातूनच विविध वृक्षांच्या बिया जमाकरून वृक्षारोपनांचा संदेश ही दिला . तसेच नागपंचमीला नागाच्या मूर्त्या तयार करण्याचे प्रशिक्षण देशून प्रत्येक मूर्तीत झांडांच्या बिया मूर्तीच्या आतमध्ये रोवून वृक्ष वाढविण्याचा सुंदर विचार शाळेत पसरवून निसर्ग वाचविण्याचे शिक्षण दिले आज विद्यामंदिर माध्य. प्रशाला म्हणजे निसर्गप्रेमी शाळा वृक्षप्रेमी शाळा म्हणून गणली जाते.आकाश कंदिल प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना जगण्याचे आर्थिक बळ राणे सरांनी प्रशालेत करून दिले आहे यासर्व उपक्रमात पालकही सक्रीय सहभागी होत असतात . विद्यार्थ्या बरोबर तेही बालपण जोपासत असतात . हे दृश्य पाहून प्रसन्नतेचा आनंद ओसंडत असतो . आज विविध रंगाचे आकाश कंदील पाहून संपूर्ण शाळा दीपोत्सावात रंगून गेली . पालक शिक्षक विद्यार्थी आनंद उत्सवात गुंग झाले आगळा वेगळा उपक्रम उत्साहाने पाहून मनमुराद आनंद लुटत होते . मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी दिपोत्सव आकाश कंदील आणि भारतीय पंरपरा भारतीय संस्कृती या विषयी कलावंत समृद्धता टिकवून ठेवत असतो याची प्रगल्भ जाणीव करून देवून कलेचे जीवनातील स्थान दाखवून दिले . याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री वणवेसर डॉ प्राजक्ता तेली मॅडम डॉ नाचने सर श्री . बोराडे साहेब ग्रामसेवक सौ बोराडे मॅडम विद्यार्थ्यांचे पालक श्री उमेश वाळके साहेब यांनी सर्व कलावंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले . व शुभेच्छा दिल्या . शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. साळुंखे मॅडम यांनी कलाशिक्षक श्री राणे सर व सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या ….