सचिन डोळे
ग्रामीण प्रतिनिधी:इंदापूर
पुणे :जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील कुंभारगाव येथील सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच आमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी कुंभारगावमधील सकल मराठा समाज बांधव शनिवार ( दिनांक.२८) पासुन साखळी उपोषणास बसलेले आहेत, सदर ठिकाणी आरोग्य विभागामार्फत उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच ग्रामपंचायत कुंभारगांवचे सरपंच सौ.उज्वला परदेशी, माजी उपसरपंच कुंडलिक धुमाळ ग्रा पं सदस्य गणेश धुमाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय मोरे, ग्रापं सदस्य सचिन गोरे, ग्रापं सदस्य स्वप्नील लोंढे, अरविंद वाघमारे, संजय ढोले, संजय सल्ले, उमेश भोईटे, राजेंद्र धुमाळ, भगवान लोंढे, किशोर धुमाळ,संतोष डोळे, प्रविण वाघमारे इतर सर्व धनगर समाज , बौद्ध समाज , भोई समाज बांधवांनकडून मराठा आरक्षण मागणीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला व भिगवण पोलीस स्टेशन यांचेकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.