कैलास श्रावणी
तालुका प्रतिनिधी पुसद
शिलाई मशीन, पिको-फॉल मशीन,साडी चोळी, घरपोच, १० शेळ्या खरेदी, दिवाळीच्या कपड्यांसाठी रोख मदत उत्तम शासनाची एक लाखांची मदतही सुपूर्द यवतमाळ दि.२६- यवतमाळ जिल्ह्यातील राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिलेला मदतीचा शब्द आज पूर्ण केला आहे. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून स्व. मनोज राठोड या शेतकऱ्याच्या कुटुंबास एक शिलाई मशीन, एक पिको फॉल मशीन घरपोच देण्यात आली असून सोबतच दहा शेळ्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या शेळ्या दोन दिवसात घरपोच दिल्या जातील. पैशांच्या स्वरूपात मदत करण्याऐवजी आम्हाला उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन व दुभती जनावरे देऊन मदत करावी अशा स्वरूपाची मागणी सदर राठोड कुटुंबाची होती.दोन महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर असताना आत्महत्या ग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या पत्नीने आपल्या मुलींसह धनंजय मुंडे यांची भेट घेऊन उदरनिर्वाहासाठी मदत करण्याची विनंती केली होती. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. राठोड कुटुंबाला शासनाची मदत १ लाख रुपयांचा धनादेशही आज सुपूर्द करण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार यापैकी ७० हजार रुपये हे ५ वर्षांसाठी पोस्ट खात्यात फिक्स ठेवले जातात तर ३० हजारांची मदत रोख दिली जाते. याशिवाय घरकुल व अन्य लाभ मिळण्याबाबतही पाठपुरावा सुरू असून, त्याही बाबी लवकरच पूर्ण होतील. धनंजय मुंडे यांच्या वतीने या कुटुंबास त्यांच्या मागणीप्रमाणे एक शिलाई मशीन, एक पिको फॉल मशीन, तसेच मुलींना दिवाळीला कपडे वगैरे खरेदीसाठी रोख ११ हजार रुपये व साडी चोळी आज सुपूर्द करण्यात आले. तर १० शेळ्या येत्या दोन दिवसात पोहोच केल्या जातील. आमदार इंद्रनील नाईक हे स्वतः धनंजय मुंडे यांच्या वतीने ही मदत घेऊन राठोड कुटुंबीयांकडे गेले होते. यावेळी मा.बाळासाहेब कामारकर पाटील जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ,मा.सौ.क्रांती धोटे राऊत राष्ट्रवादीच्या नेत्या,मा..योगेश धानोरकर जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी यवतमाळ,मा..विवेक घुंईखेडकर खरेदेविक्री संघाचे अध्यक्ष नेर,मा.विजय राठोड मा.सरपंच तथा ग्रा.प.सदस्य यरद,आकाश चंदणखेडे,आशिष मोघे,पराग पाटील,तन्मय त्रिवेदी,महेंद्र अडसड इतर सर्व युवक राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


