अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 28 ऑक्टोंबर – घाटंजी तालुक्यातील साखरा येथील ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडी प्रमुख तथा आमदार डॉ. धुर्वे यांचे स्विय्य सहाय्यक दिलीप राठोड गटाच्या नंदा ग्यानीदास गाऊत्रे हिची सरपंच पदी निवड करण्यात आली. साखरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सन 2020 मध्ये झाली होती. त्यावेळी मानकर गटाचा पराभव झाला होता. ग्राम विकास आघाडी प्रमुख दिलीप राठोड गटाचे 9 पैकी 7 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. साखरा येथील ग्रामपंचायत सरपंच पद अडीच अडीच वर्षासाठी ठरविल्यानंतर सरपंच पदी रमेश राठोड यांची निवड करण्यात आली. तसेच ठरल्यानुसार साखरा येथील सरपंच रमेश राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तदनंतर साखरा येथील सरपंच पदाची पुन्हा निवडणूक लागली. त्यात ग्राम विकास आघाडी प्रमुख दिलीप राठोड गटाच्या नंदा ग्यानीदास गाऊत्रे यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मानकर गटातर्फे अनुप वसाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी सरपंच रमेश राठोड यांनी पुन्हा सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली. यावेळी माजी सरपंच रमेश राठोड यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने राठोड यांचा उमेदवारी निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. त्यामुळे सरपंच पदासाठी सरपंच पदासाठी दोनच अर्ज शिल्लक होते. यात नंदा गाऊत्रे व अनुप वसाके यांच्यात सरपंच पदाची निवडणूक झाली. त्यात दोन्हीही उमेदवारांना प्रत्येकी 4 – 4 मतें मिळाली. दोन्हीही उमेदवारांना सारखी मतें मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात नंदा गाऊत्रे हिची ईश्वर चिठ्ठीने सरपंच पदी निवड करण्यात आली. साखरा ग्रामपंचायत निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून साखरा मंडळ अधिकारी रविंद्र शिंदे, तलाठी राजु मानकर यांनी काम पाहिले. तर ग्रामसेवक पुरूषोत्तम भगत यांनी सहकार्य केले.


