सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
चिमुर :”खलनिग्रनाय रक्षणाय पोलीस प्रशासनाच्या प्रत्येक विभागात आढळणार वाक्य आहे,सदर वाक्यामुळे पोलिस प्रशासन हे
प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी कुठलाही भेदभाव न करता अन्यायग्रस्त असलेल्या नागरिकाच्या पाठीशी व माजलेल्या गुन्हेगारांना कायदा ची भाषा शिकवत सरळ करण्याचं ताकद फक्त पोलीस प्रशासना मध्ये आहे, पण आजच्या काळत पोलीस प्रशासन राजकीय दबावातून माजलेल्या गुन्हेगारा वर वचक बसविण्यापेक्षा त्याना पाठीशी घालत का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,उपजिल्हा रुग्णालय चिमुर मधील वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद किन्नाके यांच्या शासकीय कामाकाजात अळथळा निर्माण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करत स्वतःची गुंडगिरी दहशत निर्माण करणार प्रशांत कोल्हे नामक इसमाच्या विरोधात लेखी रिपोर्ट पोलीस स्टेशनला देऊन सुद्धा सदर प्रकरणात पोलीस प्रशासन कडून अश्या जातीवादी मानसिकतेचा प्रशांत कोल्हे वर अजूनपर्यंत कोणतीही कारवाही चिमुर येथील पोलीस प्रशासनाने कारवाही न केल्याने आजही मोठ्या गुर्मीत प्रशांत कोल्हे नामक जातीवादी मानसिकतेचा व्यक्ती
आजही मोकाट फीरत आहे,त्या मुळे पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव निर्माण झाला आहे का ? अश्या दबावातून
पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे, दिनांक 20/10/2023 रोजी अंदाजे 4.15 वाजता डॉ आनंद किन्नाके हे उपजिल्हा रुग्णालय मध्ये आपल्या कर्तव्यावर ओ पी डी मध्ये असताना व आलेल्या रुग्णाची तपासणी करत असताना प्रशांत कोल्हे या जातीवादी मानसिकता असलेल्या माथेफिरूने शासकीय कामात अळथळा निर्माण करीत असल्याची मोबाईल द्वारे व्हिडीओ चित्रीकरण मध्ये स्पस्ट पणे दिसत आहे तरी पण पोलीस प्रशासन चौकशी च्या नावाखाली सदर व्यक्तिवर भारतीय दंड संहिता मधील कलम 353 नुसार कारवाही करण्यास तयार नाही, पोलीस प्रशासानावर सदर घटने बाबत कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव निर्माण झाला आहे त्या मुळे कर्तव्यावर असलेल्या डॉ बाबत अशी घटना घडून सुद्धा कुठलीही कारवाही होत नसल्याने नेमकं पाणी कुठ मुरत आहे हेच कळत नाही,आज एका प्रशासनातील शासकीय कर्मचाऱ्यावर त्याच्या कर्तव्यात बाधा निर्माण करण्यात आली आहे,पण योग्य वेळेत अश्या माथेफिरुवर कायदेशीर कारवाही होत नसेल तर असे माथेफिरू प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यावर आणखी गुर्मीत हल्ले करतील यात काही शंका नाही,अश्या प्रकारे मुळे प्रशासानातील शासकीय अधिकाऱ्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, हाच जर प्रकार एखाद्या सामान्य नागरिकाने केला असता तर पोलीस प्रशासनाने सदर इसमावर कारवाही करण्यासाठी त्याला लगेच अटक करून आत टाकले असते, मग पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाही साठी असा भेदाभाव का? कायद्याचे रक्षक असणारी पोलीस यंत्रणा कुठेही भेदभाव करीत नाही पण या प्रकरणात सदर गुन्हेगार व्यक्तीला वाचविण्यात प्रशासन मदत करीत आहे का? सदर कृत्य करणाऱ्या प्रशांत कोल्हे ला राजकीय वरदस्त असल्यामुळे त्याला वाचविण्यात येत आहे का?अशी शंका निर्माण होत आहे, कायद्यानुसार पोलीस स्टेशनला एखादा व्यक्ती फिर्याद घेऊन आला तर त्याचे म्हणणे ऐकून अगोदर एफ आय आर दर्ज करून नंतर चौकशी करावी पण झालेल्या प्रकरणात अजूनही संबंधित डॉ नी दिलेल्या लेखी फिर्यादी वर अगोदर पोलीस प्रशासन चौकशी करत आहे हे या मागील न समजणार कोड आहे.