सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार :शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या गांधी पुतळा परिसरातील बॅरिकेटिंग जे नंदूरबार शहर वाहतूक शाखेच्या मदतीने अवजड वाहतूक रोखण्यासाठी लावण्यात आले होते, या परिसरात चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी, नंदुरबार शहर वाहतूक विभागातर्फे बॅरिकेटिंग लावण्यात आले होते, परंतु नंदुरबार शहरातील हाट दरवाजा ते नळवा रोडकडे जाणाऱ्या रोडकडील रस्त्यावरील वळणावर असलेले, गांधी पुतळ्या परिसरातील बॅरिकेट हे त्या भागात अवजड वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांच्या गोदाम व प्रतिष्ठानापरियंत अवजड वाहन पोहचण्यास आडथळा ठरित असल्याने ते कापण्यात आल्याने, त्याचे काही भाग हे रोडाच्याच मध्यभागी आल्याने, त्यात वळण घेताना वाहन धारकांच्या वाहनास आपघात घडत आहेत तर बरेचसे वाहन चालक त्यात अडकुन अपघात देखील घडत आहेत, याबाबत नंदुरबार नगरपालिका तथा नंदुरबार वाहतूक शाखा विभागाने याची दखल घेऊन पुनश्च या ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करत, सदरचे कापण्यात आलेले बेरीकेटिंग हे पुनश्च पूर्वस्थितीत करावे अशी मागणी प्रवासिवर्ग व वाहन चालकांतर्फे करण्यात येत आहे, आणि या भागातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यात यावी, ही अशी देखील मागणी होत आहे.