मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे:शहरात सांय. 5 वाजता दरम्यान धामणगाव चांदुर रेल्वे मार्गावर संतोषी माता मंदिराजवळ ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव वरून विरुळ मार्गाने अमरावती कडे जाणार्या ट्रक क्र.MH27 X 4781 हा धान्याने भरलेला ट्रक अमरावती कडे जात होता.परंतु ट्रक ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्यामुळे ट्रक विरूद्ध दिशेला डिवायडर तोडून पलटी झाला. हा अपघात शहरातील मध्यभागी जाणार्या रोडवर झाला. याचवेळी शाळा सुटण्याची वेळ असल्याने शाळेतील मुले आपल्या घरी परत जातात. तसेच अनेक वृद्ध व्यक्तीं सांयकाळी फिरायला बाहेर पडतात. परंतु योगायोगाने अपघात झाला त्या वेळी या रोडवर कुणीही नव्हते. ज्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. अपघात झाल्यानंतर अर्धा तास कोणत्याही विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते.