निशांत मनवर
शहर प्रतिनिधी,उमरखेड .
विश्व महासम्राट बळीराजा यांच्या स्मरनार्थ आजहि शेतकरी हजारो वर्षांपासून ‘ ईडा पिडा टळो , बळीचे राज्य येवो ‘ असे म्हणत बळीराज्याच्या राज्याची प्रतिक्षा करतो आहेत म्हणून , कृषी संस्कृती चा जागर हि संस्कृती जपनाचे कार्य पुढे कायम राहावे आणि शेतकऱ्यांचे आत्म मनोबल वाढवावे हा मुळ हेतू समोर ठेवून बळीराजा महोत्सव समिति यांनी दिपावली पर्वा मध्ये येत्या बलिप्रतिपदा १४ नोव्हेंबरला बळीराजा महोत्सव मिरवणूक सोहळा कार्यक्रम विधान सभा अतर्गंत उमरखेड शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजित २२ ऑक्टोंबर रोजी च्या बैठकीतून समिति चे प्रमुख जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब रास्ते पाटिल यांनी या वेळी दिली आहे .राज्यात सर्वाधिक नैसर्गिक पावसाने नुकसान ग्रस्त तालुका म्हणून उमरखेड हे एकमेव आहे , शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले असतांना पिक विम्या मध्ये सन २०२१ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत देऊन दोन – चार उमरखेड – महागांव हजार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम राज्य सरकारने निधी उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून अघापही नुकसनी च्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या नाहित हे सरकारचे शेतकऱ्या प्रतिचे अपयश आहे असे बाळासाहेब रास्ते पाटिल म्हणाले.या नियोजन बैठकाला प्रा विठ्ठल हानवते , देवानंद मोरे , आशिष तालंगकर , शुभम माने जवळगांवकर , निशांत मनवर उपस्थित होते
सोबत -नियोजन बैठकीत मार्गदर्शन करतांना बाळासाहेब रास्ते पाटिल व अन्य सर्वजण.


