कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
प.पू.श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार संग्रामपूर तर्फे दि.22 ऑक्टबर रोजी सावता माळी मंगल कार्यालय मध्ये सकाळी 9 वाजता होम हवन चे आयोजन करण्यात आले.यामध्ये हवन चे पूजन करून आहुती देण्यात आली.नंतर आदिशक्तीचे देवी पूजन करण्यात आले.जवळ पास ३०० कलेक्टिविटी पुजेमध्ये आले होते.बुलढाणा,शेगाव, खामगाव,नांदुरा,मलकापुर,सोनाळा, जलगाव जामोद,सर्व भागातील सहज योगी पुजेमद्ये सहभागी झाले होते.यामध्ये गणेश पूजन, गणेश वंदना,गणेश भजन,दुर्गा देवीचे १०८ नावे घेण्यात आली.तसेच देवीचे भजन,ध्यान,करण्यात आले. पूजेनंतर महाआरती करून क्षमा प्रार्थना घेण्यात आली.यामध्ये बाल शक्ती,युवा शक्ती, यथा शक्ती सर्व सहभागी झाले होते.पूजेनंतर लगेच महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले.यामध्ये प्रा. खत्री सर,शेगाव,यांनी पुजा संचालन केले.तसेच सौ.देशमुख ताई पो.कॉन्स्टेबल बुलढाणा यांनी पूजेची संपूर्ण विधिवत माहिती दिली.पूजेचे सर्व नियोजन किसन कुटे,आनंद राजनकार युवा शक्ती प्रमुख तुषार सावतकार,अभी तायडे, यांनी केले.