मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि:23/10/2023 परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे वॅटचा मंजूर असलेला प्रकल्प सुरू का होत नाही.त्यामुळे परळीचे नुकसान होत आहे.दुसरीकडे सरकार प्रकल्प मंजूर करत आहे मात्र परळी शहरातील प्रकल्प सुरू होण्यास उशीर का होत आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. या प्रश्नात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांनी , खा. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांनी लक्ष घालून प्रकल्प मंजुरीसाठी प्रयत्न करून सुरू करावा अशी मागणी करत परळी थर्मल पॉवर स्टेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी दिली आहे.जर प्रकल्प सुरू होण्यास गती मिळाली नाही तर मोठे आंदोलन थर्मल स्टेशन येथे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने नुकतीच कोरडी आणि नाशिक या ठिकाणी दोन 660 मेगावॉटचे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आगोदर त्याठिकाणी दोन प्रकल आहेत. त्यासाठी10,625 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या परळीवर अन्याय का ? असा सवाल त्यांनी केला आहे. परळीमध्ये नवीन प्रकल्प मंजूर झाल्यास बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. परळी औष्णिक थर्मलचे एम.डी. साहेबांनी पाठपुरावा करण्यात कुचराईपणा केल्यामुळे आणि राजकीय इच्छशक्तीचा आभाव असल्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास उशीर होत आहे यात मात्र परळीकर आणि बेरोजगार तरुण भरडला जात आहे.यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास थर्मल स्टेशजवळ आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.



