अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ आणि अमोलकचंद विधी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ॲन्टी रॅगींग आणि सायबर सेक्युरीटी यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव दिनेश सुराणा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे हे होते. यावेळी मंचकावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नाहर, विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव ॲड. महेंद्र ओसवाल, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय जैन, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत (घाटंजी), सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी आदीं उपस्थित होते. यावेळी दिनेश सुराणा यांनी रॅगींग कायदा विश्लेषण करून विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य रॅगींग सारख्या गोष्टी मुळे उध्वस्त होत असल्यामुळे त्यापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांनी सायबर सेक्युरीटी संदर्भात विद्यार्थ्यांशी हितगुज केले. स्मार्ट फोन वापरण्यासाठी लोकांनी आधी स्वतः स्मार्ट बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. विजेश मुणोत (घाटंजी) यांनी सायबर क्राईम्स आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतूदी यावर न्यायीक निवाड्यांचा संदर्भ देत मार्गदर्शन केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी प्रासंगिक अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक के. ए. नाहर यांनी केले. संचालन प्रा. वैशाली फाळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी मानले. यावेळी बार असोशिएनचे अनेक विधीज्ञ, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मोठया संख्येने विधी विद्यार्थी आदीं उपस्थित होते.


