कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन.
महात्मा बसवेश्वर यांचे बद्दल अपशब्द बोलून तैलिक समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज १९ ऑक्टोबर २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिले आहे.सविस्तर वृत्त असे की वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान तथा दैवत तमाम वीरशैव लिंगायत समाज बंधू भगिनी ज्यांचे पुढे नतमस्तक होतात ज्यांना नमन करतात
अशा समता नायक विश्वगुरू जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे शिव वैकय बद्दल राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानास्पद भाषेचा वापर करून तमाम वीरशैव लिंगायत समाजाच्या अस्मितेला दुखावले असून आमचे श्रद्धास्थान तथा दैवत असलेल्या जगत ज्योति महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली असे अभद्र वाक्य वापरून आमच्या दैवतास अपमानित केले असून जितेंद्र आव्हाड यांनी गलिचे अभद्र वाक्यप्रचार केल्या बद्दल महाराष्ट्र तसेच विविध राज्यातील शिवा संघटनेच्या वतीने अज्ञानी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे
तसेच त्यांच्यावर कठोर व कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पुसद येथे निवेदन दिले आहे.
या वेळी यवतमाळ पश्चिम अध्यक्ष लक्ष्मण आगाशे जिल्हा सचिव गोविंद गाडगे श्रीराम वानखेडे संजय महाकाळ रवी सूर्य रवी इनामे, संभाजी डंबोळे, शैलेश डंबोळे नारायण कन्हेड,सतीश आजेगावकर नागोराव सूर्य.इत्यादीच्या निवेदनावर सह्या आहेत.