कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
मयत महिलेचे घरकुल गेले चोरीला घरकुल योजनेत भ्रष्टाचार असल्याचा नागरिकांचा आरोप
पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, हुडी खुर्द तांडा येथे, विधवा महिला घरकुल योजनेपासून वंचित आहेत तसेच मयत महिलेच्या नावावर घरकुल न बांधता योजनेचा निधी हडप करण्यात आला असल्यामुळे येथील महिला, ज्येष्ठ नागरिक गावातील रहिवासी यांनी सरपंच ग्रामसेवक तथा इंजिनिअर यांच्या विरोधात उपोषण व आंदोलन करणार असल्याचे सांगितले. सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासनाने गाव, खेडे,तांडा पाड्यावरील, गरीब कष्टकरी वंचित समूहाला हक्काचा निवारा मिळावा म्हणून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवाज अशा अनेक योजना शासनामार्फत राबविल्या जातात परंतु पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हुडी खुर्द तांडा येथे घरकुल मंजूर झाले परंतु लाभार्थी यांना, बांधकामाचा एक हप्ता मिळाला व आपल्या उर्वरित रकमेची मागणी केली असता तुमचे घर अतिक्रमण जागेत असल्यामुळे ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक, यांनी
बाकी निधी अडवून ठेवण्यात
आला असल्याचे श्रीमती यमुनाबाई परसराम राठोड
या लाभार्थी असलेल्या विधवा महिलेने सांगितले आहे.
चोराच्या उलट्या बोंबा या वाक्याप्रमाणे याच सर्वे नंबर मध्ये असलेले इतर लाभार्थ्यांयांना मात्र घरकुल योजनेच्या निधीचे संपूर्ण हप्ते देण्यात आल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला आहे. अनेक लाभार्थ्यांचे जुनेच घर दाखवून घरकुल योजनेचे पैसे काढण्यात आल्याचा आरोपही रहिवासी नागरिकांनी केला आहे.
ही ग्रामपंचायत सध्या समस्येचे माहेर घर बनले असून, येथील सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नाल्या बांधकाम झालेले नाही सर्वत्र सांडपाणी साचले असल्यामुळे डास निर्माण होत आहेत सध्या तालुक्यामध्ये
डेंगू मलेरिया या सारख्या साथीच्या आजाराने युवक व बालकांचा बळी घेतला आहे
संपूर्ण तालुक्यात डेंगू व मलेरिया सारखे आजार वाढीस लागले असताना येथील ग्रामपंचायत यंत्रणा मात्र निद्रित अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या संपूर्ण घरकुल योजनेची चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत सचिव गृह शाखा अभियंता तथा सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली अन्यथा आम्हाला उपोषण आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी यमुनाबाई परसराम राठोड पारीबाई थावरा राठोड चंदाबाई खिल्लारे रामींबाई दुधराम पवार इत्यादी लाभार्थी तथा महिला रहिवासी नागरिक यांनी केली आहे.