मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाने याही वर्षी भगवान भक्ती गड सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या निमित्ताने दसरा मेळाव्याचे नियोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या व बाहेरील राज्यातून फार मोठा समाज उपस्थित रहात असतो. लोकनेते कै.गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या या दसरा मेळाव्यासाठी आता यांची सुकन्या पंकजा मुंडे मार्गदर्शक करणार आहेत.यासाठी शेवगाव पाथर्डी मधुन हजारोंच्या संख्येने भगवान भक्त उपस्थित राहणार आहेत.


