प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२१ ऑक्टोंबर शनिवार ब्राह्मण समाजास भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे दि.१६ ऑक्टोंबर पासून पदुदेव जोशी पालन कर व अविनाश जोशी पालमकर या दोन्ही बंधूंनी ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ सरकारने स्थापन करावे यासाठी अमर उपोषण आझाद मैदान मुंबई येथे चालू केले आहे .पण आज ६वा दिवस आहे .पण अद्याप पर्यंत सरकारकडून या उपोषणाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे किंवा सरकारकडून कुठलाही दुजोरा न मिळाल्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर उमटत आहे. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात ब्राह्मण समाजाच्या ज्या काही संघटना आहेत . त्यांच्यामध्ये आंतरिक खळबळ सुरू आहे .जर सरकारने लवकर निर्णय नाही घेतला तर ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या वतीने विविध आंदोलने व मोर्चे होण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाज रस्त्यावर ते उतरून नाना प्रकारे आंदोलने व मोर्चे करतील अशी कुजबूज ब्राह्मण समाजात सुरू आहे. तरी लवकरात लवकर सरकारने सदरील आझाद मैदानावरील ब्राह्मण समाजाच्या उपोषणाची त्वरित दखल घ्यावी असे समाजाचे म्हणणे आहे. उपोषणास आत्तापर्यंत अनेक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे .तसेच पालम येथील नाभिक समाजाच्या वतीने पण पाठिंबा दिलेला आहे. पाथरी येथून पंचमुखी हनुमान सेवाभावी संस्था यांनी पण या उपोषणास पाठिंबा दिला आहे. आत्तापर्यंत परभणी ,माजलगाव ,बीड, ठाणे ,पाथरी ,मानवत ,सेलू ,येथून विविध संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.