बिहारीलाल राजपूत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन तालुक्यातील आव्हाना गाव किमान ८००० हजार लोकसंख्येचे असून गावात सर्व धर्मिय एकात्मतेचा सलोखा आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्रभर गाजत असलेले मराठा आरक्षणाच्या मुद्यावर श्री मनोज पा.जरांगे यांच्या समर्थनात मौजे आव्हाना गावात मराठा बांधवांचे साखळी उपोषनही सूरु होते सदर साखळी उपोषनास गावातील सर्व जाती धर्मांच्या नागरीकांनी पाठींबा दिला होता. दिनांक २१ आक्टोंबर २०२३ रोजी गावातील मराठा बांधवानी सर्व जातीधर्माच्या नागरीकांना बोलावून ग्रामपंचायत समोर सार्वजनिक सभा घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर आपापले विचार प्रगट केले. त्यावर गावातील सर्व जातीधर्माचे नवयुवक व जातीनिहाय सर्व पक्षाचे गाव पातळीवरील नेते तथा कार्यकर्त्यांचे एकमत होऊन सर्वांनी मराठा आरक्षणाला आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला.मराठा आरक्षणाला सरकार जानुन बुजून दिरंगाई करीत असून आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आव्हाना गावात सर्व पक्षाचे पुढारी व नेते यांना गावबंदी जाहीर केली आहे.यावर सर्वानुमते असे ही ठरविण्यात आले की पुढारी आणी नेत्यांना गावात येण्यासाठी लग्नसमारंभ किंवा कुणीही मयत झाल्यास यावे लागते,परंतु गावातील कुणीही नागरीकांनी कोणत्याही राजकीय पुढारी किंवा नेत्यांना, लग्न,मुंज,जावळं,साखरपुडा,जयंती,पुण्यतिथि,किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाची पत्रीका देऊन आमंत्रित करु नये.अशा आशयाचा एकमताचा सार्वजनिक सभेचा ठराव पारीत झाला असून कोणत्याही राजकीय पुढारी किंवा नेत्यांनी आव्हाना गावात पाय ठेवू नये असे जाहीर आव्हान करण्यात आले व तसा राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी, असा फलक लावण्यात आला आहे.


