निशांत सोनटक्के
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : – स्थानिक गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे नवरात्री निमित्त मातृ पुजन, गरबा व स्तोत्रपठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मातृ शक्तीचा सन्मान व जागर या कर्यक्रमाच्या उद्देशाने करण्यात आला. वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या विदयार्थ्यांकरीता स्तोत्र पठण स्पर्धेचे तर गोकुलम प्री-प्रायमरी व आठवी ते दहावी च्या विदयार्थ्यांकरीता मातृ पुजन व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाकरीता विदयार्थ्यांच्या आईंना शाळेत बोलविण्यात आले. आई शाळेत येताच विदयार्थ्यांनी आपापल्याला आईंचे चरणस्पर्श व पुजन करून शाळेत त्यांचे स्वागत केले. मुलाला त्याची संपूर्ण तयारी करून शाळेत पाठविण्यात आईचा महत्वाचा वाटा असतो. आई सकाळी शाळेत पाठविण्यापासून तर रात्री गृहपाठ पुर्णकरे पर्यंत त्याची काळजी घेते. मुलाच्या जीवनात व त्यांच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा असतो. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा उदात्त हेतू घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर वैशाली नहाते, वंदना जिड्डेवार , उज्वला सातूरवार, दिपा उत्तरवार, प्रणालिका जिड्डेवार, सोबतच संस्थेचे सचिव नरेंद्र नार्लावार, शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी व उपप्राचार्य अमित काळे उपस्थित होते. यावेळी शाळेतील मावशी आशाबाई गेडाम आणि रेखा बावणे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व विदयार्थी व पालकवर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. पालकांनी शाळेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करीत शाळेचे व संस्थाचालकांचे आभार मानले.