अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म हा विज्ञानवादी असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा धम्म देऊन गांजलेल्या लोखंडाला परीस बनविण्याचे काम केले असे प्रतिपादन धनज येथे एकता जय भीम मंडळातर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शाहरूख पठाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधि देवानंद पाचपुते तंटामुक्ती अध्यक्ष आनाजी बोंबले. पोलीस पाटील बापूराव धनवे सोसायटीचे चेअरमन प्रकाश आमले दत्तप्रसाद जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ वाळके डीलर राजाराम वाळके विष्णू चव्हाण चरण डोंगरे माजी सरपंच पत्रकार ज्ञानेश्वर राठोड तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली आरती साबळे माजी सरपंच महानंदाताई डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी युवा ब्रिगेड चे सागर शेरे, तालुका अध्यक्ष भागवत सुर्यवंशी, अनिल हरणे, प्रविण बारापात्रे, शुभम सरकाटे, दीपक कांबळे, अमर लोमटे आदी उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्धाच्या धम्मात कर्मकांड नसून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी धम्माची स्थापना झाली असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य वक्ते शाहरूख पठाण यांनी केले.तसेच धनजं या गावातील तालुका कृषी अधिकारी झालेली आरती साबळे व कोतवाल पदी निवड झालेल्या चव्हाण यांचे सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते चरण डोंगरे यानी केलें. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष डोंगरे, बालाजी गायकवाड,आदित्य डोंगरे, प्रवीण ढोबळे, अमोल जोगदंडे , नंदू पठाडे, संतोष ढोबळे, दुर्गेश वाळके, समाधान आमले, जयराम कऱ्हाळे , गौतम ढोबळे, रघुवीर जाधव , सचिन चव्हाण व सर्व गावकरी मंडळी आणि पदाधिकारी एकता जय भीम क्रांती मंडळ धनज आदींनी परिश्रम घेतले. संचालन अमोल जोगदंडे तर आभार प्रदर्शन देवानंद पाचपुते यांनी मानले.


