रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा
तेल्हारा : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले होते इथे संपूर्ण सात तालुक्यातील वयोगट 17 वर्षांमधील मुले मुली खेळण्यासाठी आलेल्या होत्या. यामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडच्या विद्याथी मोहम्मद बेग मिर्झाने भालाफेक या स्पर्धेत विभाग स्तरावर आपले नाव नोंदवत या विद्यार्थ्यांने विजय प्राप्त करत शाळेचे नाव विभाग स्तरावर नेले आहे. विभाग स्तरावरून तो आता राज्यस्तरासाठी खेळणार आहे.या विद्यार्थ्यांने आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक जगदीश वडाळकर सर व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर आणि आपल्या पालकांना दिले असून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक, संस्थेचे उपाध्यक्ष लुंकरण डागा व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर आणि शाळेच्या उपमुख्याध्यापिका गांधी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


