निशांत मनवर
शहर प्रतिनिधी ,उमरखेड
उमरखेड : येथील भारतीय जनता पार्टीचे वाहतूक शाखा शहर अध्यक्ष तथा रुग्णसेविका वाहन चालक योगेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवरात्रोत्सव निमित्त येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे गर्भवती मातांना साडीचोळी देऊन साजरा करण्यात आला यावेळी योगेश यांच्या सोबत आई उषाताई ठाकूर , पत्नी स्वाती ठाकूर ,वर्षा लोखंडे व भाची पूजा लोखंडे यांच्यासह ठाकूर कुटुंबीयांनी योगेश यांचे वाढदिवस दि 2 ऑक्टोंबर रोजी साजरा न करता आज दि 15 ऑक्टोंबर रोजी नवरात्रोत्सव निमित्त येथील शासकीय रुग्णालयातील गर्भवती मातांना व रुग्ण महिलांना साडी चोळीची भेट दिली .या अनोख्या उपक्रमामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी या उपक्रमाविषयी योगेश ठाकूर यांचे कौतुक केले. त्यासोबत रुग्णालयातील सर्व कर्मचारी व भारतीय जनता पार्टी वाहतूक शाखेच्या वतीने योगेश यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. याप्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ रमेश मांडण सह येथील महिला कर्मचारी व डॉक्टरांनी योगेश ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या .