दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा: दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तळोदा येथील मिरा कॉलनीतील राहिवास्यांच्या शिष्ट मंडळाने शहादा, तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या सोमवल येथील कलावती फॉर्म हाऊस याठिकाणी जाऊन भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मिरा कॉलनी येथे सालाबादप्रमाणे आदीशक्ती नवदुर्गा मातेची स्थापना करण्यात येत आहे.तसेच नवदुर्गा मातेची पहिलीच माळ असल्या निमित्ताने कॉलनीतील नागरिक तसेच महिला यांनी या भागातील आ. राजेश पाडवी यांची भेट घेऊन आपल्या कॉलनीतील स्थानिक समस्या मांडल्या ज्यामध्ये गटारी, रस्ते, तसेच पथदिवे याबाबतची समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे कळकळीची विनंती करण्यात आली.यामध्ये सांगण्यात आले की, मिरा कॉलनी ही तळोदा शहरातील सगळ्यात आधी निर्माण झालेली नवीन वसाहत आहे.असे असले तरी ही वसाहत नेहमी दुर्लक्षित राहिली आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी ही वसाहत नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने काही कामांना याठिकाणी सुरुवात झालेली आहे.तर काही कामांना मंजुरी मिळालेली नाही.तरी आपल्या स्तरावर लक्ष घालून राहिलेल्या कामांना मंजुरी घेऊन सुरवात करावी अशाप्रकारची विनंती त्यांना करण्यात आली. याविषयी आमदारांनी ही उपस्थित शिष्टमंडळाजवळ योग्य ती चर्चा केली आणि लवकरच कॉलनीतील समस्या दूर करण्यात येतील असे आलेल्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.यानंतर शिष्टमंडळानेही नवदुर्गा मातेच्या नऊ दिवसांमध्ये आ.राजेश पाडवी यांनी मिरा कॉलोनीत उपस्थित राहावे व मातेची आरती करावी असे आमंत्रण ही त्यांना देण्यात आले. याप्रसंगी कॉलनीतील रहिवाशी यशवंत शिरसाठ, पुंडलिक चौधरी, डॉ.भूपेंद्र अहिरे, बाळा आगळे,बबलू चित्ते, शुभांगी अहिरे, लता चौधरी, सुनंदा शिरसाठ, ज्योती बोरसे, रवीना आगळे, भारती चित्ते इत्यादी नागरिक उपस्थित होते.


