कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
आज दिनांक १०ऑक्टोबर २०२३ रोजी, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत मानसिक, व्यसनमुक्ती, मेंदू रोग निदान, उपचार शिबिर संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन, पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सुविद्य, पत्नी मोहिनी नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सर्वप्रथम धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली.या शिबिराला अनेक रुग्णांनी नोंदी करून शिबिरामध्ये सहभाग घेतला, शिबिर विषयाच्या अनुषंगाने रुग्णांची तपासणी करून व त्यांचे समुपदेशन करून व विशेष उपचार पद्धती रुग्णांना सांगण्यात आल्या मानसिक आरोग्य संदर्भात सखोल विषयाची देण्यात आली सर्व रुग्णांनी मानसिक संतुलनातून बाहेर पडून आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याच्या महत्वपूर्ण सुधारणा कराव्या असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन विशेषतज्ञ डॉ.विनोद जाधव यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मोहिनी इंद्रनिल नाईक,राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष इरफान खान, इत्यादिची प्रमुख उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.अतुल रुणवाल, डॉ. राहुल जाधव, डॉ. विनोद जाधव, डॉ. श्रीकांत गोटे, डॉ. इमरान खान, समुपदेशक सरफराज अहेमद,अधिपरिचारिका रेखा पिंपळकर, समुपदेशक नितीन कांबळे,डॉ. विनोद खाडे, रूपाली शेंडे, फार्मासिस्ट संजय गावंडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायकवाड, यांनी केले तर आभार सहाय्यक अधीक्षक उद्धव धोंगडे यांनी केले. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी आपला सहभाग नोंदविला आहे.