सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड: दि. ११ ऑक्टोबर २०२३ वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या बीड जिल्ह्यातील महासभेने मोठी चपराक दिली असून मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यातील आजी माजी नामधारी राजकीय नेत्यांच्या झोपा उडाल्या असून काल झालेल्या या महासभेने बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या सभेला जिल्ह्याभरातून फक्त २००० लोक येतील असे भाकीत करणाऱ्या विरोधकांना बीड जिल्ह्यातील महासभेने मोठी चपराक दिली असून जिल्ह्याभरातील राजकारणासह संपूर्ण मराठवाड्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काल झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेने विरोधकांच्या आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या झोपा उडाल्या असून या महासभेच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. सभेला संबोधित करताना ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना निर्णय घेता येत नसल्याचे सांगितले त्याचबरोबर ज्याला निर्णय घेता येत नाही तो देशाचं काय नेतृत्व करणार असाही टोला दिला.भारत देशातील बहुजन समाजाला आपले हक्क अधिकार स्वतंत्र जर कायम ठेवायचे असतील तर संविधान वाचवणे महत्त्वाचे आहे. तसेच या देशातील जनतेला वि.दा. सवरकर, गोडवळकर, यांची मनुस्मृती महत्वाची आहे का फुले शाहू आंबेडकरांचे संविधान महत्वाचे आहे. हे तुम्ही ठरवा असे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी जनतेला उद्देशून म्हणाले त्याचबरोबर जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्तेत दिली तर देशातील बहुजन समाजाचे प्रश्न मार्गी लागतील आणि सर्वांना त्यांचे हक्क अधिकार मिळतील नरेंद्र मोदी यांना लगेच हिमालया पाठवू असा टोलाही वंचित बहुजन अंगाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी लावला. महासभेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी सुध्दा विरोधी पक्षातील विरोधकांचा समाचार घेतला काल झालेल्या महासभेने प्रस्थापीतांचे आणि विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.