सय्यद जुनेद अली
ग्रामीण प्रतिनिधी नेकनूर .
नेकनूर : केज उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पंकज कुमावत साहेब यांना दिनांक 11/10/2023 रोजी गुप्त खबरीकडून बातमी मिळाली कि, नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत धुळे – सोलापूर महामार्गांवर वरून अवैध गुटखा वाहतूक होत असून MH -23 AU 9875 क्रमांकाचा गुटखा वाहतूक करणारा पिकअप हद्दीतून जाणार आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, उपविभागातील, पोलीस अंमलदार बाळासाहेब, डापकर, दिलीप गिते, अनिल मंदे,भरत शेळके, तसेच केज पोलीस स्टेशनचे महादेव बहिरवाळ, शमीम पाशा असा उपविभागातील पोलीस स्टाफ, व नेकनूर पोलीस स्टेशन चे पोलीस उप-निरीक्षक रोकडे अशांनी श्री. कुमावत साहेबांच्या आदेशाने वानगाव फाट्याजवळ संत तुकाराम महाराज मंदिरा समोर सापळा लावून नमूद क्रमांकाची पिकअप ताब्यात घेतली.सदर पिकअप मध्ये सुमारे 25 लाख 82 हजार रूपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुंगधित पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ गुटखा मिळून आला आहे. सदर बाबत पोलीस नाईक दिलीप गिते यांचे फिर्यादी वरून चार आरोपी विरुद्ध नेकनूर पोस्टे गुन्हा रजि. नंबर 317 /2023 भा. दं.वी. कलम 328,272,273,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई मुळे गुटखा माफियांना चांगलीच चपराक बसली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा पदार्थांची वाहतूक होत असून याला नेमके कोणाचे अभय आहे.प्रत्येक कामासाठी शासनाचे स्वतंत्र विभाग असताना सगळी कामे कारवाई पोलीस विभागानेच करायची का ? अन्न प्रशासन विभागाची यामध्ये काय भूमिका आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी कोणाला आहे काय? अशी उलट सुलट चर्चा लोकांमध्ये होत आहे.