शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड : नांदेड येथील शंकरराव चव्हाण जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी व चौकशीसाठी गेलेले खासदार हेमंत पाटील चौकशी करीत असताना योग्य माहिती मिळाली नसल्याने व दवाखान्याची अस्वच्छता पाहता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरूनविचारपूस केली असता पंरतू तेथील डीन ने खा हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी व खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे येथील शिवसैनिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत दि 5 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्र्यांना गुन्हे मागे घेण्याची निवेदनातून मागणी केली आहे. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य म्हणून नांदेड येथील शंकरराव चव्हाण जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी गेले असता तेथील रुग्णालयातील औषधीचा तुटवडा व घाणीचे साम्राज्य पाहून अक्षरशः हेमंत पाटील यांनी औषधी व डॉक्टर यांच्या संदर्भात सखोल चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांना धारेवर धरले त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डीन यांनी हेमंत पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले सदरील दाखल केलेले गुन्हे चौकशी करून मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन घेऊन येथील शिवसैनिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याला निवेदनातून मागणी केली आहे यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम , तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिरासे , तालुकाप्रमुख संतोष जाधव ,विनायक कदम, संदीप ठाकरे ,अतुल मैड, मनोज कुबडे ,प्रसाद घोंगडे, अनिल ठाकरे, दयानंद नरवाडे, ज्ञानेश्वर वानखेडे ,कपिल चव्हाण, भागवत अडकिने ,कृष्णा जाधव आदी शिवसैनिकांनी निवेदन दिले.