सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
बेल्हे : जुन्नर विधानसभेतील बेल्हे – राजूरी जिल्हा परिषद गटातील बेल्हे गावात, शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना जुन्नर विधानसभेचे संपर्कप्रमुख दिलीप बाम्हणे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात अभियान संपन्न झाले .यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक बोलघेवडया योजना आणि भूलथापा उघड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात आलेल्या भांडाफोड अभियानाची सुरुवात जुन्नर तालुक्यातील बेल्हे याठिकाणी शिवसेना शाखेत करण्यात आली . २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ला फरपटत भारतात आणू ,प्रत्येकाच्या हाताला रोजगार देऊ , पेट्रोल डिझेल चे भाव कमी करू , प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देऊ ,महागाई आटोक्यात आणू अशा अनेक बोलघेवडया योजना केल्या पण त्यापैकी एकही गोष्ट सांगितल्या प्रमाणे पुर्ण केली नाही याचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात कंबर कसली आहॆ .हे अभियान संपूर्ण वाड्या वस्त्यांवर पोहचवण्याचे काम शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहॆ .हे अभियान १ ते १२ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून यात सर्व शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाम्हणे यांनी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना केले .याप्रसंगी उपतालुकाप्रमुख श्री.मोहन बांगर , प्रमुख पदाधिकारी,शाखाप्रमुख राजेंद्र गफले ,बाळासाहेब बांगर ,नाजिम बेपारी ,विकास बांगर ,राहुल बांगर ,बबन औटी ,अनिल शिंदे शिवसैनिक तसेच शेतकरी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.