बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : तालुक्याकरीता स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय सुरु करण्याबाबत चा निर्णय आज शासनाने प्रसिद्ध केला,आमदार राहुल कुल यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले. आणि दौंड येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. दौंड येथे प्रांत कार्यालय व्हावे यासाठी आंम्ही गेले अनेक वर्षे आग्रही होतो, आपल्या मागणीनुसार आमचे नेते, आधारस्तंभ मा.ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दौंड तालुक्याकरीता स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती. व तदनंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, महसूल मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रक्रियेला गती देण्यास मोलाची मदत केली, आज सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन दौंड तालुक्याकरीता स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्याच्या निर्णय झाला. याचा मला मनस्वी आनंद आहे . दौंड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल दौंड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार, महसूल मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. ना.चंद्रकांत पाटील यांचे तसेच महायुती शासनाचे आभार मानतो असे आमदार राहुल कुल म्हणाले.
चौकट..
महाविकास आघाडी चे सरकार असताना प्रांत कार्यालय दौंड येथे व्हावे, यासाठी तत्कालीन उपमुख्यमत्री मा.अजित दादा पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे आंम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. सदर मागणीला आज यश आले. तरी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार व महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हार्दिक आभार अजित दादा पवार यांचे विषेश आभार. असे मत महानंदा च्या माजी अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी सांगितले.
चौकट..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून आंम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सतत भेटून प्रांत कार्यालय दौंड येथे होण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. आणि त्यासंदर्भात निवेदने ही दिलेली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आणि हे कार्यालय दौंड येथे मंजूर करण्यात आले आहे. याचे श्रेय सर्वस्वी अजितदादा पवार आणि यांना जाते कोणीही याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. असे माजी आमदार रमेश आप्पा थोरात म्हणाले.