मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : राजुरा वरून 20 कि.मी.अंतर पार करत बैलगाडीने पोहचले शेतकरीतहसीलदारांना सोयाबीन पिक दाखवत प्रगट केली व्यथा तालुक्यात झालेला कमी पाऊस त्यामुळे सोयाबीनचे घटलेले सरासरी उत्पादन, मोझाक रोगामुळे वाळलेले पीक यासर्वांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना सरसकट ५० टक्यांच्या वर नुकसान भरपाई मिळण्यात यावी यासाठी राजुरा गावातील व तालुक्यातीलशेतकऱ्यांच्यावतीने तहसिल कार्यालय येथे भव्य बैलगाडी मोर्चा गुरूवारी काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राजूरा येथील ग्रा. पं. सदस्य भूषण काळे या युवा शेतकऱ्याने केले. तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानमुळेशेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन घेऊन बैलबंडीमध्ये टाकुनराजुरा येथून राजुरा निभा, जवळा फाटा, बग्गी, कळमगाव, कळमजापूर, सोनगाव, चांदूर रेल्वे जुना स्टँडवरूनतहसिलकार्यालय येथे पोहचला.यावेळी बैलबंडीमध्ये शेतकऱ्यांचे रोगाने वाळलेले पीक घेऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी पोहचले शासनाने मदत व पिक विमा मिळावा अशीही मागणी करत त्यांनी तहसीलदार यांना शेतातून आणलेले पीक दाखवले व आपली व्यथा मांडली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱयांच्या पिकांचे अर्ध्याहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकविम्याचा आली. यावेळीराजुरा, एकपाला, बोरी, टोंगलाबाद, धानोरा, मोगल, वाई, किरजवला, निभा, बग्गी,धानोरा, मोगल, वाई, किरजवला, निभा, बग्गी, कळमगाव, कळमजापूर, सोनगाव, दिघी कोल्हे, कवठाकडू, पळसखेडवतालुक्यातील शेतकरी,बांधवयामोर्चात सहभागी होतेराजुरा गावातील तसेच संपूर्ण चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीन पिकाची झालेली दुरवस्था बघता तसेच उशिरा पाऊस आल्याने येलो मोझॅक या रोगाने सोयाबीन पीक हे संपुर्ण करपल्या गेले आहे. व सोयाबीन पिकाची शेंग भरण सुद्धा झालेली नाही. त्यामुळे शेतातील सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणातनुकसानझालेले असूनशेतकऱ्याना ५०% पेक्षाजास्त सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्यात यावी याकरिता आमचा हा मोर्चा आहेभूषण काळे, ग्रा. पं. सदस्यराजुरा