मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून केंद्रातल्या नऊ वर्षाच्या आणि राज्यातल्या सरकारने अनेक घोषणा केल्या. नागरिकांना विविध आश्वासनं दिली परंतू प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांच्या माध्यमातून नागरिकांची कशी फसवणूक केली जात आहे,याची माहिती नागरिकांना ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून दिली जात आहे.रायगड लोकसभा मतदार संघातील श्रीवर्धन तालुक्यामधील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून गावागावात हे अभियान राबविलं जात असून बोर्लीपंचतन येथे शुक्रवार दि.६ ऑक्टोबर रोजी तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महागाई,बेरोजगारी, सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण,शेतकरी आत्महत्या,पेट्रोल,डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दमदुप्पट झालेले दर,दुर्बल घटक,मुंबई गोवा महामार्गाच रखडलेलं काम अशा गंभीर समस्या त्याचबरोबर पंतप्रधानांनी भूमिपूजन करुनही अद्याप न झालेलं शिवस्मारक त्याशिवाय गंगा स्वच्छ झाली का? स्मार्ट सिटी झाल्या का?काश्मिरी पंडित घरी परतले का? मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळालं का?आतंकवादी दाऊद आणि देशाला अब्जावधींचा चुना लाऊन परदेशात पळालेले विजय माल्या,निरव मोदी, चोक्सी ई.गुन्हेगारांना फरपटत आणलं का..? सत्तेचा दुरुपयोग करुन विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचे षडयंत्र रचून महाराष्ट्रातील ऊध्दव ठाकरेंच पाडलेलं सरकार,महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग व येणारे विविध प्रकल्प पळवून गुजरातला नेऊन येथील बेरोजारांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे केलेलं काम या गोष्टी व उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजना व विकास कामे ‘होऊ द्या चर्चा’ च्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घराघरात पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.यापुढे गावागावात ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम राबविण्यात येईल.असं तालुकाप्रमुख आविनाश कोळंबेकर यांनी सांगितलं. यावेळी उपतालुकाप्रमुख जूनेद दुस्ते, शिवसेना रायगड अल्पसंख्यांक अध्यक्ष मसूद दर्जी,एजाज हवालदार,संघटक गजानन कदम,शाखाप्रमुख गजू भाटकर,अंजर पिरकर, शिवकुमार निषाद,असे शिवसेनेचे विविध पदाधिकारी, ग्राम पं.सदस्य संतोष कांबळे, माजी सरपंच निवास गाणेकर, चिंतामणी वडके व हिंदू,मुस्लीम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


