रोहे : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई येथे बुधवारी वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने रोहा तालुका हादरला आहे. लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०, रा. धामणसई आदिवासीवाडी, ता. रोहा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या संबंधीत रोहा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. लक्ष्मी वाघमारे यांच्या झोपडी पासून ५० मीटर अंतरावर जंगलामधील पायवाटेवर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या घटनेच्या तपासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.