श्रीवर्धन : गेली अनेक वर्षे पत्रकरिता क्षेत्रामध्ये काम करणारे बोर्लीपंचतन येथील ज्येष्ठ पत्रकार उदय विठ्ठल कळस यांची नव्याने स्थापन झालेल्या श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उदय कळस यांच्या पुढाकाराने व सर्व सदस्यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील या पहील्या नोंदणीकृत पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी विजय कांबळे, सचिव गणेश प्रभाळे, खजिनदार मकरंद जाधव तर सहसचिव अभिजीत मुकादम व सहखजिनदार मुज्जफर अलवारे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली असून सर्फराज दर्जी,मिलिंद जाधव, रमेश घरत,संजय प्रभाळे, कुणाल कळस हे सदस्य असलेल्या श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाला नुकतेच शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ‘डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघ महाराष्ट्र’ या संघटनेला हा संघ संलग्न असून यापूढेही या पत्रकार संघाच्या माध्यमातून सत्य,वास्तव आणि विविध समस्या त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांना लेखणीच्या माध्यमातून शासन, प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सकारात्मक पत्रकारीता करण्यास कटीबध्द असेल.