सतिश गवई
उरण तालुका प्रतिनिधी
उरण : नवी मुंबई आयुक्तालया मार्फत उरण पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे तक्रार निवारण कक्षाची सेवा २४ तास महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. त्याच पाश्वभूमीवर आता उरण पोलीस ठाण्याच्या ताफ्यात दोन दुचाकी निर्भया पथकासाठी दाखल झाल्या आहेत. यामुळे महिलांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना केली आहे.निर्भया पथकामुळे महिलांना रात्री-अपरात्री कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास पोलीस दीदी मार्फत महिलांना तत्काळ मदत मिळते. निर्भया पथकामुळे महिलांना रात्री कामावरून जातांना गाडी नसेल किंवा गुंडाचा त्रास होत असेल एखाद्या मुलींची छेडछाड होत असेल किंवा जेष्ठ नागरिकांना रात्री कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल, तर ११२ नंबर दाबल्यावर पाच ते दहा मिनिटांमध्ये नजिकच्या पोलीस ठाण्याची मदत आपल्याला मिळते.