आजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : अखंड मानव जात ही ईश्वराची लेकरे असून यात ईश्वराने कोणताही भेदभाव केला नाही. मात्र काही स्वार्थी लोकांनी समाजात ही धर्माची दरी आडवी करून माणसाला माणसाच्या विरोधात उभे केले. मात्र ही जातीयतेची भिंत पाडून हिंदू मुस्लिम बांधवांनी ढाणकी शहरात पुन्हा एकदा एकात्मतेचा संदेश दिला.ढाणकी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एक मताने हिंदू बांधवांच्या आषाढी एकादशी या महत्त्वाच्या सणा निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्व कायम राहण्यासाठी व सर्वधर्म समभावाची भावना वाढीस लागावी या दृष्टीने ढाणकी शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी आपले बकरी ईद सणानिमित्ताने धार्मिक परंपरेनुसार करण्यात येणारी कुर्बानी दुसऱ्या दिवशी व त्यापुढील दिवशी करण्यात येणार असल्याने कळविण्यात आले आहे सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकता वाढीस लागण्याकरिता ढाणकी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने उचललेले हे मोठे पाऊल असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे ढाणकी शहरातील सलोखा कायम कौतुकास्पद राहिलेला आहे त्यामध्ये मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेमध्ये एकतेचा संदेश जणू अशा प्रकारचा एक संदेश मुस्लिम बांधवांनी दिला आहे.
चौकट – मी एकादशीनिमित्त मुस्लिम बांधवांनी कोणतीही कुर्बानी देऊ नये याबद्दल माझे मत त्यांच्यासमोर मांडले. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देणे हे प्रत्येक मुस्लिम बांधवांना गरजेचे असतानाही त्यांनी सामाजिक सलोखा राहावा या उद्देशाने एकादशी व बकरी ईद च्या दिवशी कुठलीही प्रकारची कुर्बानी देणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो आणि असेच समाजामध्ये एकोपा राहावा ही विठुराया चरणी प्रार्थना करतो. प्रताप भोस, ठाणेदार, पोलीस स्टेशन बिटरगाव


