विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : महागाव क्षेत्राचे भौगोलिक क्षेत्र खूप मोठे असल्यामुळे खरबी दरती येथील नागरिकांना उमरखेडला येण्यासाठी जवळपास 65 किलोमीटर अंतर पार करून यावे लागते त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागत होता शासकीय काम कोणीही असो यासाठी त्यांचा पूर्ण दिवस जाऊन काम होईल किंवा नाही याची सुद्धा हमी नव्हती न्यायालयीन कामासाठी तर त्यांचा पूर्ण दिवस जाऊन सुद्धा काम होत नसल्यामुळे आणि वरिष्ठ न्यायालयाकडे जायचे असेल तर त्यांना एकशे दहा किलोमीटरच्या अंतर पार करून जावे लागते हीच बाब लक्षात घेऊन उमरखेड येथील वकिलांनी वरिष्ठ न्यायालयाची मागणी लावून धरली होती. त्या मागणीचा पाठपुरावा उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला व हे काम लवकरात लवकर कसे मार्गी लावता येईल यासाठी सुद्धा अतिशय मेहनतीने काम केले आणि या बाबीकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन उमरखेड येथे वरिष्ठ स्तर न्यायालय पारित केले. खऱ्या अर्थाने या भागातील लोकांना जलद गतीने न्याय मिळेल अशी आशा आमदार नामदेव ससाने यांनी व्यक्त केली .


