कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा : येथील मुस्लिम बांधव कुर्बानी ईद च्या दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे.यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, समाजात एकता अखंड राहावी, जातीय सलोखा राखला जावा, आणि एकमेकांप्रती आदरयुक्त धर्मभावना निर्माण व्हावी, जातीय द्वेष, धार्मिक तेढ, निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.वारकरी संप्रदायांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आषाढी एकादशी दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रा मधून विविध संतांच्या दिंड्या घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. यामध्ये सर्व जाती धर्माचे लहान थोर गरीब श्रीमंत सहभागी होतात. कोणताही भेदभाव होत नाही. हाच बंधुभाव जातीय सलोखा कायम राखला जावा, समाजामध्ये कोणताही धर्मद्वेष पसरला जाऊ नये, धर्म भावना आणि संत विचारांचा आदर राखला जावा, सोनाळा गावातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी करत असताना, प्रथापरंपरेनुसार बकरी कुर्बान करण्यात येतात, परंतु याच दिवशी एकादशी व ईद असल्याने दोन्ही सणाचे पावित्र्य राखण्याचे विचार करून, या दिवशी फक्त नमाज पठाण करून, दुसऱ्या दिवशी बोकड कुर्बानी करण्यात येणार आहे. व आषाढी एकादशी आणि बकरी ईद सण सर्व समाज एकत्र मिळून साजरा करण्यात येणार आहे.


