सय्यद रहीम राजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : सुकळी (ज.)जुन महिना संपत आला तेव्हा तुरळक ठीकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आलेला दिवस कोरडाच जात होता. मृग नक्षत्रात पेरणी होणे अपेक्षित होते पण मृग कोरडा गेल्याने पेरण्या रखडल्या गेल्याने डाळ वर्गीय उडीद, मुगाचे क्षेत्र घटनार तर आहेच व डाळ वर्गीय पिकांना फटका बसणार आहे. तर पशुच्या चा-यांचा कडब्याचा प्रश्न ऐरणीवर राहील अशी शेतक- यांची प्रतिक्रीया आहे. सुकळी जागीर.अमानपुर चिल्ली जागीर व रुड बीबी नागेशवाडी दिंडाळा चुरमुरा पोफाळी मरसुळ दहागाव बोथा तसेच परिसरात हंगामी पिकक्षेत्र अधिक असुन कोरडवाहु पिकांचे क्षेत्र अधिक असल्याने खरीप हंगामाला सर्वाधीक शेतकरी प्राधान्य देतात. त्यासाठी शेतकऱ्याना पावसावर आवलंबूनच शेती करावी लागते. जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेली पेरणी खरीप हंगामासाठी सर्वाधीक योग्य समजली जाते. या वेळेत पेरणी झाल्यास सोयाबीनसह उडीद व मुग या दाळवर्गीय पिकांचे क्षेत्र अधिक वाढते. किड रोगाचा कमी प्रादुर्भाव वेळेवर काढणी होऊन उत्पादन अधिक मिळते. शिवाय रब्बी हंगामाच्या पेरण्याही वेळेत होण्यास मदत होते. मात्र जुन महिन्याचे पहिल्या दोन आठवड्यात पावसाने दडी मारली उन्ह, उकाडा व उष्णता कायम असल्याची स्थीती होती. जुन महिन्यातही उष्णतेची लाट कायम राहील्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या आहेत. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उडीद मुगाचे क्षेत्र वाढवण्यास प्राधान्य देतात. मात्र मृग संपत आला तरी पावसाने ओढ दिल्याने उडीद, मुग या दाळवर्गीय पिकांचे पिकपेरा घटणार असुन सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. पाऊस लांबल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन तलाव विहीरींनी तळ गाठला आहे. यामुळे पशुच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. पेरण्या लांबल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोयाबीन बीयानाकडे शेतक-यांचा कल वाढत असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावयण व तुरळक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खत व बियाणाच्या खरेदीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. तर पेरणी लांबणीवर गेल्यामुळे सोयाबीनचा पेरा अधिक होणार असुन संशोधीत वाणांना शेतकरी पंसती देत आहेत. केडीस ७५३ या नवीन सोयाबीनच्या वांणाला शेतकरी पहिली पंसती देत आहेत. तर गेल्या दोन वर्षापासुन बाजारपेठेत स्थीरावलेल्या केडीएस ७२६ या बियानालाही शेतकरी प्राधान्य देत आहेत. लवकर येणारे, रोगाला कमी बळी पडणारे, व काढणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या बियांनाचा शोध शेतकरी घेत आहेत. तुरीच्या क्षेत्रातही घट होणार गेल्या तीन वर्षात तुरीच्या पिकाला रोगाचा प्रादुर्भाव जानवत आहे. तुरीचे पिक ऐन फुलोरा व फळ अवस्थेत असताना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन पुर्ण पिकच वाळत असल्याचा अनुभव येत आहे. महागडी बुरशीनाशक व अन्य औषधांचा वापर करूनही कोणताच लाभ होत नसल्याने यावर्षी तुरीच्या बियांनाच्या मागणीत घट झाली आहे. सध्या तुरीचे बाजारभाव दहा हजार रुपयापेक्षाही अधिक असुनही उत्पादनच निघत नसल्याने क्षेत्रात घट होणार आसल्याचे दीसून येत आहे. एकंदरीत परिस्थिती पहाता राज्यासह तालुक्यात मान्सून jदाखल झाल्याने व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण दिसून येत असून शेतकऱ्यानी पेरणीसाठी कंबर कसली आहे.