शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड : जालना येथे सराटी अंतरवेली या गावात मराठा आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर ,महीला वर लाठी चार्ज करून त्यांना शासन प्रशासनाने बेदम मारहाण केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ उमरखेड येथे काल सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते तसेच आज दुपारी १२ वाजता विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्या सर्व युवकांनी सभा घेऊन सभेमध्ये सोमवारी कडकडीत बंद करण्याचा ठराव घेऊन मंगळवार पासुन ४ मराठा आंदोलकांनी आमरण उपोषणाचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये समंत करण्यात आला तशा प्रकारचे निवेदन उमरखेडचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. सोमवारी उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवुन मंगळवारपासून आमरण उपोषणाला तहसीलच्या प्रांगणामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर 2023 पासून सचिन घाडगे ,गोपाल कलाने, सुदर्शन जाधव ,शिवाजी पवार हे मराठा युवक मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध मागणी करिता आमरण उपोषणाला बसत आहेत करिता याची माहिती प्रशासनाला निवेदनाद्वारे त्यांनी देण्यात आली आहे तसेच मराठा क्रांती मोर्चा द्वारे उमरखेड शहरातील व्यापारी संघटनांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की उद्याला सर्वानी या बंद ला सहकार्य करावे अशी माहीती मराठी क्रांती मोर्चा च्या वतीने देण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे युवक उपस्थित होते