अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
पाथर्डी : तालुक्यातले पिरेवाडी गावचे ग्रामदैवत नवसाला पावणारे देवस्थान भैरवनाथ यात्रा महोत्सव याही वर्षी धुमधडाक्यात कावडीची मिरवणूक छबिना जंगी कुस्त्यांचा हंगामा या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून यात्रा साजरी करण्यात आली. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पाथर्डी तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र गर्जे शिवसेना नेते विष्णुपंत पवार यांनी मनोभावे दर्शन घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मल्हारी डमाळे माजी सरपंच अर्जुन आघाव ग्रामपंचायत सदस्य नाना आघाव व ग्रामस्थ मंडळीने यात्रेचे छान नियोजन केले होते.


