विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट : खिशात पैसा नाही काळ्याआई च्या पदरातून मिळणारे उत्पन्न नाही, विहिरी कोरड्या, ठाक पाण्याची नाही, असे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या अंधारात जगत आहे,तालुका दुष्काळाच्या उंबरड्यावर असून, बळीराजा मात्र प्रतीचा मान्सून चागला बरसेल, या असेवर आकाश्याकडे डोळे लावून बसला आहे,जिल्यातील शेतकरी रिमझिम पावसावरच पिके तग धरून होती परंतु मोठा व चागला पाऊस नसल्यामुळे पावसाने हिरमोड केल्याने खरीप पिके धोक्यात आली आहे,पाण्याअभावि पिके कोरपली जात असून, उत्पनाला मोठा फटका बसणार हे नि्चित असून, खर्च मोठया प्रमाणात होऊन हातात काहीच शिल्लक राहणार नाही, हे तितकेच खरे.यंदा मोठया प्रमाणात शेतकऱ्याने सोयाबीन पिकाचा पेरा केला आहे, पिके जरी हिरवी गार दिसून येत असतील पण पाण्याअभावि शेगा भरल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे,सुरवातीला चागला पाऊस पडला त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला,पण पिकाला आवश्यक अश्या प्रमाणात पाऊस पडला नाही,त्या मुळे आजरोजी सोयाबीन पिकाची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे,चागल्यात चागल्या प्रमाणात उत्पादन म्हणून सोयाबीन पिकाची ओळख आहे,सोयाबीन पासून अनेक उत्पादन तयार करण्यात येतात, पण येंदा या पिकाची अवस्था बिकट झाली असून शेतकरी पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.