सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी, नंदुरबार
नंदुरबार:एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी आलेली एक कोटी पाच लाख रुपयाची रक्कम, भरणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पळविल्याने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास एटीएममध्ये भरणा करण्यासाठीची रक्कम घेऊन जात असताना, नंदुरबार शहरातील धुळे चौफुली नजीक असलेल्या बडोदा बँकेसमोर व्ह्यान थांबवून त्या ठिकाणी बँकेतच्या एटीएम मध्येरक्कम भरणा करून येतो, असे सांगून बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठीची सुमारे एक कोटी पाच लक्ष रुपयाची रक्कम पळवल्याची खळबळजनक घटना, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात घडल्याने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे, नंदुरबार बॅकेच्या एटीएम मशीनमध्ये कॅश पुरवठा करणार्या व्हॅनवरील कर्मचार्यानेच रोकडवर मारला व्हॅनमधील रोकडवर डल्ला, कॅशव्हॅन मधील 1 कोटी 5 लक्ष रुपयांची रोकड घेवून कर्मचारी फरार, नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातला प्रकार, रायटर कॉर्पोरेशन कंपनीच्या व्हॅनमधील रोकडसोबत घडला सदरचा प्रकार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी जात होती व्हॅन, रस्त्यात एका फायनान्स कंपनीचे कॅश कलेक्शनसाठी व्हॅन थांबली असतांनाच, दुचाकीने जावून पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये कॅश भरुन येतो असे म्हणून, व्हॅनमधली कॅश काढून कर्मचारी गेला तो पुन्हा परतलाच नाही, यानंततर तब्बल दोन तासांनी पोलीसांसोबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधला शहर पोलिसांशी संपर्क, नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे, आरोपीच्या शोधासाठी जिल्हाभरात पोलीस प्रशसाणातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे.











