रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
भूषण नरेश टीलावत याने महाराष्ट्र लोकसेवाआयोगा द्वारे एम पी यस सी परीक्षेत महाराष्टात द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. हिवरखेड रुप. ता. तेल्हारा या गावातील मराठी प्रायमरी शाळेतील शिक्षण घेतलेल्या, पण उपजतच असलेली बुद्धिमत्ता ,वडील मुख्याध्यापक तर आई मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शन आणी उत्तम संस्कारातून पुणे येथे भूषण ने पदवीधर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.येथील माजी मुख्याध्यापक नरेश टीलावत यांचे सुपुत्र भूषण याची स्टाफ सिले क्शन कमिशनअंतर्गत सी पी डब्ल्यू डी मध्येइंजिनीयर या पदावर नियुक्ती झाली आहे .भूषण ने स्टाफ सिलेक्शन कमिशन , एस एस सी ,जे ई या परीक्षेत पूर्ण भारता तून 31 वा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला होता.नोकरी सुरू असताना प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर फिनिक्स पक्षाप्रमाणे, उत्तुंग गरुडझेप घेत स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम , चिकाटी , सतत अभ्यास करून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवाआयोगा द्वारे ( M .P. S.C. ) आयो जीत खडतर व आव्हाना त्मक परीक्षेत संपूर्ण राज्यातून द्वितीय क्रमांक मिळविला. भूषण नरेश टीलावत यांच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या चौफेर , उत्तुंग यशाबद्दल भूषण च्या दैवदुर्लभ अशा उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.