विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:हर घर तिरंगा मेरी मिट्टी मेरा देश या संकल्पनेतून सोमवार (दि.१४) ऑगस्ट दिवशी ग्रामपंचायत डिकसळ यांच्या वतीने,तसेच योगेश्वरी विविध कार्यकारी सोसायटी , तसेच जि. प. शाळा डिकसळ यांच्या वतीने शासकीय इमारतींवरती ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संरक्षण दलातील शहीद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत डिकसळच्या वतीने देशाच्या संरक्षणामध्ये गावातील ज्या महान व्यक्तींनी योगदान दिलं त्या सर्व माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी, माजी एस.आर.पी. कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व हार देऊन गावाच्या वतीने गावातील सरपंच मनिषा गवळी उपसरपंच, संदीप भोंग पोलीस पाटील संदीप पवार,तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर काळे व ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आबासाहेब हगारे सर्व संचालक व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर सर्व नागरिकांनी पंच प्रतिज्ञा देण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने योगेश्वरी मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर ग्रामपंचायत इमारतीमध्ये सन्मान शिलालेख बसवण्यात आला व त्याचे उद्घाटन सन्माननीय सरपंच मनिषा गवळी, उपसरपंच संदीप भोंग व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामसेविका प्रतिभा देवकाते यांनी केले सूत्रसंचालन रवींद्र गवळी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सतीश दराडे यांनी मानले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)